खरवस - Kharwas

Kharwas in English वेळ: २५ मिनिटे वाढणी: ३० ते ३५ मध्यम तुकडे (७ ते ८ जणांसाठी) साहित्य: १ लिटर पहिल्या दिवसाचा दुधाचा चिक (खाली महत्...

Kharwas in English

वेळ: २५ मिनिटे
वाढणी: ३० ते ३५ मध्यम तुकडे (७ ते ८ जणांसाठी)


साहित्य:
१ लिटर पहिल्या दिवसाचा दुधाचा चिक (खाली महत्त्वाची टिप नक्की वाचा)
१ लिटर दुध
दोनशे ते अडीचशे ग्राम साखर (साधारण १ पाणी प्यायचे फुलपात्र)
२-३ चिमटी केशर
१/२ टीस्पून वेलचीपूड
मोठा कुकर
२ कुकरच्या आतील डबे (टीप २ पहा)

कृती:
१) केशर अगदी थोडे कोमट करून पाव वाटी दुधात भिजत घालून ठेवावे.
२) चिक आणि दुध एकत्र करून त्यात साखर घालावी. साखर विरघळेस्तोवर ढवळावे. चव पाहून लागल्यास अजून साखर घालावी.
३) केशर आणि वेलची पूड घालून मिक्स करावे.
४) तयार मिश्रण कुकरमध्ये भात शिजवतो तसेच शिजवून घ्यावे.
कुकरचे २ मोठे डबे घ्यावे. डब्यात तयार मिश्रण सारखे विभागून घालावे. कुकरच्या तळाशी दीड इंचभर पाणी घालावे. एक डबा अलगदपणे पकडीच्या मदतीने आत ठेवावा. त्यावर ताटली ठेवावी. त्याच्या डोक्यावर अजून एक डबा ठेवावा. वर अजून एक ताटली ठेवावी. झाकण लावून २ शिट्ट्या कराव्यात. आच बारीक करून मिनिटभराने बंद करावी.
५-८ मिनिटांनी कुकरचे प्रेशर गेल्यावर झाकण काढून दोन्ही डबे बाहेर काढावेत. गार होईस्तोवर हवेवर उघडेच ठेवावे.
कोमटसर झाले की खाल्ले तरी चालते. पण फ्रीजमध्ये गार करून खाल्ल्यास अजून स्वादिष्ट लागतात.
खरवस फ्रीजमध्ये ८ दिवस सहज टिकतो.

टीप:
१) चिक पहिल्या दिवसाचा असल्यास दाट असतो त्यामुळे त्यात तेवढेच दुध घालावे लागते (१ लिटर चिकास १ लिटर दुध)
पण जर दुसऱ्या दिवसाचा चिक असल्यास निम्मे दुध लागते. आणि तिसऱ्या दिवसाला निम्म्याहून थोडे कमी लागते. चिक विकत घेताना तसे विचारून घ्यावे.
२) कुकरच्या आतील डब्ब्यांपेक्षा पोळी ठेवायला जे स्टीलचे डबे वापरतो तेही वापरू शकतो. खरवस उकडताना वर डब्ब्याचे झाकण न लावता ताटली ठेवावी म्हणजे कुकरमधून बाहेर काढताना त्रास होत नाही. खरवस हवेवर निवळला की डब्ब्याचे झाकण लावून तसाच फ्रीजमध्ये ठेवू शकतो.
३) साखरेपेक्षा गुळाचा खरवस जास्त खमंग लागतो. यात आवडीनुसार साखर किंवा गुळाचे प्रमाण कमीजास्त करावे.
४) वेलचीपूड ऐवजी जायफळ घातले तरी छान लागते.
५) खरवस उष्ण असतो त्यामुळे गरोदर स्त्रियांनी हे खाणे टाळावे.

Related

Sweet 1889803577921472032

Post a Comment Default Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Hi Vaidehi....
    Thanks खरवसाची रेसीपी पोस्ट केल्याबद्दल...एक योगायोग तुम्हाला सांगावासा वाटतोय बरेच दिवसांपासून खरवस खायची इच्छा होतीये आणि कालच गावाला वासरू झाल्यावर सगळ्यांनी खरवसाचा मनसोक्त आनंद घेतला हे ऐकून अमेरिकेत असल्याची खंत वाटत आणि हा खरोखर खूप गोड योगायोग की आज तुम्ही हि रेसिपी पोस्ट केलीत...please मला सांगाल का कि अमेरिकेत मला चिक कुठे मिळेल ?...
    तुमच्या सगळ्याच रेसिपीस खूप छान आहेत....मी बऱ्याच करून बघितल्या पण कधी comment करायला नव्हत जमत ....खूप खूप आभार कि मी तुमच्यामुळे खूप पदार्थ शिकू शकले...लग्नानंतर प्रत्येकवेळी काही करायचा तर आईला फोन करून विचारण शक्य नव्हत तेव्हा छोट्या छोट्या टिप्स साठी पण हा ब्लॉग खूप उपयोगी आला...

    अर्चना

    ReplyDelete
  3. Chick USA la kuthe milato?

    ReplyDelete
  4. hi
    chik kuthe milato

    ReplyDelete
  5. hi vaidehi, dudhacha chik mhanje kay g?

    ReplyDelete
  6. commentsathi dhanyavad.

    गाय/म्हैस व्याल्यावर जे पहिले दुध काढतात त्याला चिक असे म्हणतात. त्यापासून खरवस बनवतात.

    अमेरिकेत चिक कुठे मिळतो हे माहित नाही.
    भारतामध्ये असाल तर गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाचा चिक हा दुध डेअरीमध्ये मिळू शकतो. किंवा घरी दुधाचा रतीब असेल तर दुधवाल्यास सांगून ठेवावे म्हणजे गाय/म्हैस व्याली की तो आणून देऊ शकेल.

    ReplyDelete
  7. Ameriket, cheek 'Whole Foods' madhye kadhi kadhi milto 'Colostrum Milk' chya naavani, it's not a regular item anhi toh prachanda mahag asto.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you for this information. I will try colostrum milk for this recipe. did u try it. Only Whole foods shop or any other shop madhe try kela aahe ka?

      Delete
    2. Nahi me kadhi vaprun nahi pahilya whole foods madhil cheek.

      Delete
  8. Dhudacha cheek milat nasel tar dudhat china gras takun sudha kharavas karata yeto,chavit thodasa pharak aasato.

    ReplyDelete
  9. Me china gras vaparun pahile ahe pan mala tyachi chav avadli nahi. avadat asalyas china gras vaparun pudding sarkhe karu shakto.

    ReplyDelete
  10. चिकाचे दुध जास्त दिवस कसे साठउण ठेवता येइल? dry colostrum milk बनवता येइल का ?

    ReplyDelete
  11. It's awesome and perfect recipe of kharwas. I made it today , it is perfect.thanks for recipe.

    ReplyDelete
  12. Nice recipe... i followed it... first time my kharwas was perfect. This time it became little chewy... does it happen due to over cooking?

    ReplyDelete
    Replies
    1. praman jar barobar ghetle asel tar chewy honyache karan nahi..kadachit dudhache praman kami ghetle asel tar vadi jast ghatta padte.

      Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item