फोडणीचे ताक - Fodaniche Tak

Fodniche taak in English वेळ: ५ मिनिटे वाढणी: २ कप साहित्य: २ कप ताक १/२ टिस्पून तूप १/२ टिस्पून जिरे १/४ टिस्पून हिंग १ सेमी आल्य...

Fodniche taak in English

वेळ: ५ मिनिटे
वाढणी: २ कप

साहित्य:
२ कप ताक
१/२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
१/४ टिस्पून हिंग
१ सेमी आल्याचा तुकडा, ठेचून
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१ आमसुलं (ऐच्छिक)
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मिठ

कृती:
१) तयार ताक एका पातेल्यात काढून ठेवावे.
२) छोट्या कढल्यात तूप गरम करावे. जिरे, हिंग, मिरच्या आणि आल्याचा तुकडा घालून फोडणी करावी. कोथिंबीरही फोडणीतच घालावी. ताकामध्ये हि फोडणी घालून मिक्स करावे. चवीनुसार मिठ घालावे.
३) जर ताक आंबट नसेल तर आमसुल, २-३ चमचे गरम पाण्यात थोडावेळ भिजत ठेवावे आणि हे आंबट पाणी ताकात घालावे.
४) हे ताक गरम केले नाही तरीही चालते. पण गार ताक प्यायचे नसेल तर अगदी मंद आचेवर किंचित कोमट करावे. खुप गरम करू नये नाहीतर ताक फुटते.
जेवताना हे ताक मधेमधे प्यायला तसेच मुगतांदुळाच्या खिचडीबरोबरही हे ताक छान लागते.

टीप:
१) ताक जर आंबट असेल तर आमसूल घालू नये.

Related

Marathi 2846745666135203242

Post a Comment Default Comments

  1. Wooooooooooooooooooooooooooo..............!!!!!!!!



    I like it :D

    ReplyDelete
  2. ताक बनविल्या नंतर किती वेळात प्यावे …जर ताक बनवून बरेच तास झाले असतील तर ताक फुटते का ???



    ReplyDelete
    Replies
    1. Tak banavlyavar kadhihi pyale tari chalte.. fakt khup garam karu naye. aaj banavun dusaryadivashi pyale tari chalte ..teva mag fridge madhye thevave.
      Incase thode jast garam karayche asel tar takala thode tandulache pith lavave. tyamule taak futat nahi. tasech taak mand achevar garam karave ani sarkhe dhavalave.

      Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item