अळीवाची खीर - Alivachi Kheer

Alivachi Kheer in English अळीव पौष्टिक असल्याने बाळंतिणीच्या तब्बेतीसाठी उत्तम असतात. प्रसुतीनंतर कंबरदुखीवर अळीव गुणकारक आहे, तसेच पचनक्...

Alivachi Kheer in English

अळीव पौष्टिक असल्याने बाळंतिणीच्या तब्बेतीसाठी उत्तम असतात. प्रसुतीनंतर कंबरदुखीवर अळीव गुणकारक आहे, तसेच पचनक्रिया सुधारते. बलवर्धक असल्याने अशक्तपणासाठी अळीव खाल्लेला चालतो.
अळीव उष्ण असल्याने गरोदरपणात शक्यतो खाऊ नये.

वेळ: १० मिनीटे (अळीव भिजवलेले असतील तर)
वाढणी: १ ते दिड कप

alivachi kheer, pregnant women diet, pregnancy diet, healthy recipe, high calorie food, Indian post pregnancy diet recipes, postpartum recipes, lactating recipes, lactation boosting recipes
साहित्य:
१ कप दूध + अजून पाव कप दूध अळीव भिजवायला
१ ते दिड टेस्पून अळीव
३ ते ४ बदाम
१ खारीक (टीप २)
साखर चवीनुसार (साधारण दिड ते दोन टिस्पून)
चिमूटभर वेलचीपूड

कृती:
१) एका वाटीत अळीव पाव कप दुधात भिजत घालावेत (टीप ५). बदाम आणि खारीक दुसर्‍या वाटीत दुध किंवा पाण्यात भिजत घालावेत. (महत्त्वाची टिप १ पाहा). अळीव, खारीक आणि बदाम किमान ४ तास तरी भिजत ठेवावेत.
२) ४ ते ५ तासांनी अळीव चांगले फुलून येतील. तसेच खारीक बदामही चांगले भिजलेले असतील.
३) बदामाची साले काढून पातळ काप करावेत. खारकेची बी काढून खारकेचे बारीक तुकडे करावे.
४) दूध गरम करावे त्यात भिजवलेले अळीव घालावे. साखर, खारीक आणि बदाम घालून मध्यम आचेवर ३-४ मिनीटे शिजवावे. वेलचीपूड घालून ढवळावे आणि गरम गरम प्यावे.

टीप:
१) जर उन्हाळा असेल तर दुध फ्रिजबाहेर खराब होते. अशावेळी अळीव, खारीक आणि बदाम पाण्यात भिजवावेत.
२) जर खारकेचे तुकडे नको असतील तर खारकांची पूड करून ठेवावी. खीर करताना उकळत्या दुधात थोडावेळ शिजू द्यावी.
३) बदाम, खारीक भिजवलेले पाणी तसेच बदामाची साले पौष्टिक असतात. सोललेली बदामाची साले चावायला जरा चामट लागतात तरीही सालांमध्ये भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. तेव्हा पाणी आणि साले फेकून देऊ नयेत, खाऊन टाकावीत.
४) आवडीनुसार पिस्ता, काजू, बेदाणेसुद्धा खिरीत घालू शकतो.
५) अळीव भिजवताना चमच्याने निट ढवळावे. अळीव हलके असतात त्यामुळे ते पाण्यावर/ दुधावर तरंगतात आणि कधीकधी निट भिजत नाहीत.

Labels:
Lactation Boosting Recipes, Aliv kheer, Balantinicha ahar, post pregnancy recipes

Related

Sweet 2112385942275156204

Post a Comment Default Comments

  1. चकलीताई, ही खीर एकदम मस्त होते...आताच केली आणि लापशी रवा सुद्धा...एकत्र कमेन्ट देतेय.....सध्या बाळंतपणामुळे असलं काही शोधतच होते...आणखी अशाच सोप्प्या रेसिपी असतील तर जरुर टाका...
    धन्यवाद...

    ReplyDelete
  2. Hi अपर्णा
    सर्वप्रथम तुझे अभिनंदन!! बाळाचं नावही छान ठेवलेयस :)
    आणि कमेंटसाठी धन्यवाद ... अजून काही पोस्ट प्रेग्नंसी रेसिपीज पोस्ट करायचा प्रयत्न करेन.

    ReplyDelete
  3. Hi

    Thank you so much for such beautiful and healthy recipes. Do you know what alive is called in English as i was trying to find it in indian store and couldn't find it here in US.

    ReplyDelete
  4. Hi vaidehi..
    thnx for d nice recipe... :)

    ReplyDelete
  5. thanks vaidu,hi khir khupch chan zali ani alivache ladu suddha ag pan mala non veg recepies hawyat tya kuthe miltil

    ReplyDelete
  6. Thanks Amrita,
    Chakali blog var tula vegetarian recipes miltil karan me nonveg khat kinva banvat nahi

    ReplyDelete
  7. Hi Vaidehi,

    Thanks for "aliv kheer" recipe." Mala Aliv kheer milel yachi shanka hoti Pan ti milali ani tihi marathit tyamule khup anand zala Karan Aliv la Garden Cress Seed mhanatat hehi knowledge ethech Vadhale :) ".

    ReplyDelete
  8. Namaskar Prabha

    chakali blog la bhet dilyabaddal ani Comment post kelyabaddal dhanyavad.

    ReplyDelete
  9. Hi vaidehi. Alive aani Haliv mhanje same aahe ka

    ReplyDelete
  10. Hi Manisha

    Ho donhi samech astat.

    Ithe me foto detey - Aliv seeds

    ReplyDelete
  11. आई ग्ग्ग !!!

    हे हळीव मला आई बाळंतपणनंतर रोज सकाळी खायला द्यायची ....जाम वैतागायचे तिच्यावर ...पण चव खरच छान होती

    हे खाल्ल्याने दूध वाढतं

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item