लेमन राईस - Lemon Rice

Lemon Rice in English २ जणांसाठी वेळ: १० मिनीटे साहित्य: अडीच कप शिजलेला मोकळा भात (शिळा भात चालेल) २ टिस्पून तूप १/२ टिस्पून जिरे ...

Lemon Rice in English

२ जणांसाठी
वेळ: १० मिनीटे

lemon rice, South Indian lemon rice recipeसाहित्य:
अडीच कप शिजलेला मोकळा भात (शिळा भात चालेल)
२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
१/८ ते १/४ टिस्पून हिंग
१/२ टिस्पून किसलेले आले
४ ते ६ कढीपत्ता पाने
मूठभर शेंगदाणे
१/२ टिस्पून उडीद डाळ
३ लाल सुक्या मिरच्या, तोडून
दिड टेस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मिठ
कोथिंबीर, बारीक चिरून

कृती:
१) भात हाताने मोकळा करून घ्यावा. त्यात मिठ आणि लिंबाचा रस घालून हलक्या हाताने मिक्स करावे. शितं अख्खी राहू द्यावीत.
२) कढईत तूप गरम करावे, त्यात शेंगदाणे ब्राऊन होईस्तोवर परतावे. शेंगदाणे परतले कि त्यात जिरे, हिंग, आले, कढीपत्ता, उडीद डाळ, लाल मिरच्या घालून परतावे आणि भात फोडणीस घालावा. व्यवस्थित परतावे. कोथिंबीर पेरून गरमा गरम सर्व्ह करावे.

टीप:
१) जर ताज्या भाताचा लेमन राईस बनवायचा असेल तर भात मोकळा शिजवावा आणि मोठ्या ताटात पसरवावा, थोडा गार झाला कि अर्धा तासभर फ्रिजमध्ये ठेवावे आणि नंतर फोडणीस घालावा.
२) उरलेल्या भातापासून फोडणीभात, टॅमरिंड राईस करता येतो, तसेच इतर भाताचे प्रकार इथे पाहा.
Label:
Lemon Rice, South Indian lemon rice recipe

Related

South Indian 3035543249214084328

Post a Comment Default Comments

  1. "त्याव्यतिरिक्‍त गूगलवर "मराठी पदार्थ" असा सर्च केलात तर चकली, वदनी कवळ घेता, असे मस्त नवनवीन मराठमोळ्या पदार्थांच्या रेसिपीज असलेले ब्लॉगस सापडतील. www.chakali.blogspot.com वर तर अस्सल खेकडाभजी, बटाटाभजीपासून कोथींबीरवडीपर्यंत चटकदार रेसिपीजची माहीती मिळते "

    हे वर्णन आहे सकाळ ग्रुपच्या " तनिष्का " मासिकातले, ऑगस्ट २००९ "

    असेच लिहित जा, सातत्याने, उत्तोमोत्तम .

    ReplyDelete
  2. नमस्कार हरेकृष्णजी,
    खुप खुप आभार ही छान बातमी मला दिल्याबद्दल!! मागेसुद्धा पेपरमध्ये आलेली बातमी तुम्हीच दिली होतीत.. आणि तुमच्या शुभेच्छांसाठी खरंच खुप धन्यवाद..

    ReplyDelete
  3. masta ahe hi recipe!!

    Recipe calendar..
    ani weekend recipes chya suggestions..
    wa..wa masta ch idea ahe hi!
    your blog rocks.. :)
    Keep it up!

    ReplyDelete
  4. धन्यवाद संजिवनी कमेंटसाठी

    ReplyDelete
  5. Hi Vaidehi,
    Good one mast zala hota lemon rice. Karan readymade powder flavour ni ti majja yet navhati. Ata vacationla gelyavar mazya chotya bhavala karun khayla ghalen. B'cos he likes it n ur blog gives perfect recipes. Keep cooking & amcha pot bharing. Shambho tuza kalyan karo.

    Priya k . Kulkarni

    ReplyDelete
  6. hi vaidehi

    mala na chitranna chi pak kruti havi aahe.

    mala mazi kanadi friend karun anaychi. pan ti singapore la aahe so tuzyakadun details milatil ka ?

    anurupa

    ReplyDelete
  7. Hey Vaidehi
    Mast jhala hota aamacha lemon rice...!:)
    Thanks for this simple and tasty recipe..
    By the way...Ur name is Vaidehi Bhave ka?

    ReplyDelete
  8. Ekdum Zakaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaas, I am taking deep interest in cooking, and my son is also like the test.

    Sayali/ Vaishali

    ReplyDelete
  9. ekdum Zakaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaas
    I am taking more interest in cooking and my son like the test

    Sayali - Vaishu

    ReplyDelete
  10. can i suggest u something i m south indian as we made this lemon rice at home we add turmeric/ haldi to give lemon colour to rice in the beginning with lemon juice and salt so that it look more delicious and this dish is long lasting for 2-3 days so we carry for long journey like frm mumbai to chennai by train thnks

    Dakshina menon

    ReplyDelete
  11. Thanks Dakshina for your comment and tip.

    ReplyDelete
  12. Finally blog renew zala Congrats!!!!!!!!!!

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item