मूग मटकी सलाड - Moog Matki Salad

Boiled Moong Matki Salad ( English Version ) वाढणी: १ मध्यम बोल साहित्य : १/२ कप उकडलेली मटकी १/२ कप उकडलेले मूग १/२ मध्यम कांदा, चिरल...

Boiled Moong Matki Salad(English Version)

matki recipe, matki salad, salad recipe, recipe for salad, salad recipes, sprouted moong salad, sprout salad, moong salad, moong matki salad
वाढणी: १ मध्यम बोल
साहित्य:
१/२ कप उकडलेली मटकी
१/२ कप उकडलेले मूग
१/२ मध्यम कांदा, चिरलेला
१ मध्यम टोमॅटो, बिया काढून चिरावा
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली
१ चमचा लिंबूरस
१ लहान चमचा चाट मसाला
चवीपुरते मिठ
२ चमचे चिरलेली कोथिंबीर
१ पाती कांदयाची काडी
सजावटीसाठी:
१ लहान गाजर

कृती:
१) १/२ कप उकडलेली मटकी आणि १/२ कप उकडलेले मूग बनवण्यासाठी प्रत्येकी १/४ कप मूग आणि मटकी घ्यावी. १०-१२ तास भिजत ठेवावे. मूग मटकी भिजल्यावर त्यातील पाणी काढून टाकावे व मूग मटकीला थोडे मिठ चोळून घ्यावे. प्रेशरकूकरमध्ये पाणी घालावे. मूग आणि मटकी कूकरच्या डब्यात घ्यावी. या डब्यात पाणी घालू नये. फक्त कूकरमध्ये तळाला जे पाणी घालतो त्यावरच मूग मटकी शिजू द्यावी. मूग मटकी खुप जास्त शिजू देवू नये. जर त्या प्रमाणाबाहेर शिजल्या तर सलाडची चव बिघडेल.
२) शिजवलेले मूग मटकी, चिरलेला कांदा, थोडा पाती कांदा, चिरलेला टोमॅटो, मिरची मिक्स करून एका बोल मध्ये ठेवावे. बोलवरती झाकण ठेवून १/२ तास फ्रिजमध्ये ठेवावे.
३) एका वाटीत लिंबूरस, थोडे मिठ, चाट मसाला मिक्स करून ठेवावे. हे मिश्रण सलाड सर्व्ह करायच्या आधी त्यात मिक्स करावे. कोथिंबीर, बारीक केलेले गाजर आणि पाती कांदा याने सजवावे. यावर चवीसाठी थोडी फ्रेश मिरपूड घालावी.

टीप:
१) मूग आणि मटकीला मोड काढून हे सलाड अधिक पौष्टिक बनवू शकतो.

Labels:
Healthy Salad, Moong salad, Matki salad, moth salad, oilfree recipe, healthy heart, heart healthy diet, moth recipes, matki recipe, low calorie diet, low, calorie recipes, low calorie food, low calorie salad

Related

Salad 105633579927433003

Post a Comment Default Comments

  1. माझ्या सारख्या डायटींग करण्याऱ्या साठी हा तर अम्रुत आहार.

    ReplyDelete
  2. hi ,
    I will try this salad.
    I tried your misal recipe, it was awesome..
    Keep posting :)

    Bye & Love
    Shilpa

    ReplyDelete
  3. Cooker nasel tar kase shijvavet moong?

    ReplyDelete
  4. मुग आणि मटकी कूकर मध्ये शिजवताना साधारण किती शिट्ट्या द्याव्यात ? तसेच जर त्यांना मोड आली असेल तरी ते कूकर मध्ये शिजवून घ्यायचे का ? जर हो, तर किती ?

    ReplyDelete
  5. भिजवलेले मुग किंवा मटकी पाण्यातून काढावेत. कुकरच्या तळाशी १ इंच पाणी ठेवावे. कुकरच्या डब्ब्यात पाण्यातून काढलेली मूग,मटकी घालून ३ शिट्ट्या करून कराव्यात. मुग मटकीत शिजवताना डब्ब्यात पाणी घातल्यास ते जास्त शिजतात, अख्खे राहात नाहीत.
    मोड आले असले तरी वरील प्रमाणे शिजवावे.

    ReplyDelete
  6. खूपच शानदार

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item