वांग्याची भजी - Vange Bhaji

Vangyachi Bhaji (English Version) साहित्य: १ वांगे 1/२ कप बेसन पिठ १ टेस्पून तांदूळ पिठ १/२ टिस्पून हळद १ टिस्पून तिखट १/४ टिस्पू...

Vangyachi Bhaji (English Version)

eggplant recipe, Indian Eggplant recipes, Brinjal Recipe, Spicy Eggplant Pakoda

साहित्य:
१ वांगे
1/२ कप बेसन पिठ
१ टेस्पून तांदूळ पिठ
१/२ टिस्पून हळद
१ टिस्पून तिखट
१/४ टिस्पून जिरे
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) वांग्याचे गोल पातळ काप करावे. मिठाच्या पाण्यात काप १० मिनीटे घालावेत.
२) बेसन पिठात पाणी घालून गुठळ्या न होता नेहमी बटाटे वड्याला जितके घट्ट भिजवतो त्यापेक्षा थोडे पातळ भिजवावे, ज्यामुळे वांग्याच्या कापांना बेसनाचे कमी आवरण होईल आणि थोडा कुरकूरीतपणा येईल.
३) बेसनाच्या पिठात तांदूळ पिठ, लाल तिखट, जिरे, मिठ, हळद घालावे. जर उपलब्ध असेल तर थोडा ओवा, चिरलेली कोथिंबीर घालावी.
४) कढईत तेल गरम करावे. बेसन पिठात वांग्याचे काप बुडवून तळून काढावेत. हिरवी चटणी किंवा लसणीच्या चटणीबरोबर गरम गरम भजी खावी.

Labels:
Eggplant Recipe, Eggplant Fritters, Eggplant Pakoda, Vangyachi Bhajji, Maharashtrian Eggplant recipe, Spicy Eggplant bhaji, Pakoda

Related

Snack 4452371937571117082

Post a Comment Default Comments

  1. तुम्ही मायाळुच्या पानांची भजी खाल्ली आहेत का ?

    ReplyDelete
  2. kahi tarich kay harekrishanji mayalucha pana chi kadhi bhaji hotil ka???
    eeeeeeeeeeeee
    Nilima

    ReplyDelete
  3. Thx vaidehi tai thx for this recipe. maze MR. vange mhantlyawer lagech nake,tonde vakdi kartat pan aata bhaji mhantlyawer khatil te, karen kuthlihi bhaji asu de khanarech etke bhajyache ved aahe tyana :) chala bhaji chya nimityane ka hoyina vange potat jayil :) thx agen

    ReplyDelete
  4. निलिमाजी,

    मी काय मस्करी करतोय असं वाटतय काय ? मायळुच्या पानांची भजी खरच खुप छान लागतात. खावुन तर बघा.

    विश्वास बसत नसेल तर बायकोला करायला सांगतो व त्याचे फोटो ब्लोगवर टाकतो

    ReplyDelete
  5. तुम्ही मिरचीची भजी कशी बनवाइची सांगू शकता का ?

    मिरचीचीच्य भजीची कृती तुम्ही please सांगाल का?

    ReplyDelete
  6. हा फोटो मी वापरतोय बरं का माझ्या ब्लॉग वर.. :) चालेल नां??

    ReplyDelete
  7. वा..तुमच्या रेसीपी वाचतानाच आणि सुंदर फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले...खेकडा भजी..काय नाव पण दिली आहेत..ग्रेट..तुमच्या रेसीपी ट्राय करून बघणार आणि इतरांना वाचण्यासाठी दिल्या तर चालतील नां..अर्थात आपल्या चकलीब्लॉगचा रेफरन्स देऊनच..
    शशीकांत

    ReplyDelete
  8. शशीकांत,

    तुमच्या कमेन्टसाठी धन्यवाद! तुम्ही चकलीच्या रेसिपी इतरांना वाचण्यासाठी नक्की दया. फक्त रेसिपी शेअर करताना कॉपीराइट कडे लक्ष ठेवा. चकलीवरच्या इमेजेस किंवा रेसिपीज पुनर्प्रकाशित करू नयेत.
    चकलीच्या रेसिपीज व्यक्तिगत वापराकरिता प्रिंट करायला किंवा चकली ब्लॉगची लिंक इतरांसाठी द्यायला काहीही हरकत नाही.

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item