मूगाची आमटी - Moog Amati

Moog amati ( English Version ) साहित्य: १ वाटी हिरवे मूग २ चमचे खवलेला नारळ फोडणीसाठी : २ चमचे तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून ज...

Moog amati (English Version)

moong amati, healthy soup recipe, moong soup reicpe, moong salad recipe, diet food, maharashtrian food, indian food, amati recipe, vegetarian recipe, oilfree recipe
साहित्य:
१ वाटी हिरवे मूग
२ चमचे खवलेला नारळ
फोडणीसाठी : २ चमचे तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमुटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट, ३-४ कढीपत्ता पाने
२ पाकळ्या लसूण
१ लहान कांदा (ऑप्शनल)
१ लहान टोमॅटो
सुपारीएवढी चिंच
१ टिस्पून गूळ
२ टिस्पून गोडा मसाला
मीठ
कोथिंबीर

कृती:
१) मूग १०-१२ तास भिजत घालावे. पाण्यातून उपसून जाड सुती कापडात ८-१० तास गच्च बांधून मोड येऊ द्यावेत.
२) मोड आले कि त्यातील कडक राहिलेले मूग काढून टाकावे. मूग २ शिट्ट्या करून कूकरमध्ये शिजवून घ्यावे.
३) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता,ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालून फोडणी करावी. नारळ परतावा. जर कांदा वापरणार असाल तर कांदा उभा बारीक करून घालावा. कांदा परतला कि त्यात टोमॅटोच्या फोडी घालाव्यात.
४) टोमॅटो १-२ मिनीटे परतून त्यात मूग घालावे. मूग १-२ मिनीटे परतून त्यात २ भांडी पाणी, चिंच घालावी.
५) एक उकळी काढून गूळ आणि गोडा मसाला घालावा. मीठ घालावे. थोडा वेळ मध्यम आचेवर उकळू द्यावे. चिरलेली कोथिंबीर घालावी. गरम गरम तूप भाताबरोबर हि आमटी झकास लागते.

Labels:
Moong Amati, Maharashtrian Amati, moong recipe, Green Gram Recipe, Moogachi Amati

Related

Moog 2959121526538775079

Post a Comment Default Comments

  1. ताकाची कढी त्यात बेसनाचे गोळे घालुन करतात ती, त्याचीही कृती द्या न प्लीज...
    मुगाची कढी खुप आवडली. हेल्थ फ़ूड म्हणूनही खायला हरकत नाही.

    साधना.

    ReplyDelete
  2. Dhanyavad sadhana comment sathi

    me lavakarach post karen Kadhi golyachi kruti...

    ReplyDelete
  3. Tumchya recipes cchan ahet mi try karat aste nahami Thank u for such useful blog, mala nagpuri vadabhat ani golabhat yanchi recipe havi ahe please nakki post kara

    ReplyDelete
  4. Nakki post karen nagpuri vadabhat ani gola bhat recipe

    ReplyDelete
  5. Hi...Vaidehi
    Aajach karun baghitali moogachi aamti...khup mast zali hoti...thanks....

    Ragini

    ReplyDelete
  6. hello vaidehi...

    Me mugachi amatichi recipe google var search karat hote... tujha he web page milal...chaan recepi milali khup sundar amati keli hoti me...thanks to you...:)

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item