बेबी ओनियनची भाजी - Baby Onion Bhaji

Baby Onion Bhaji साहित्य: दिड कप बेबी ओनियन पाऊण कप बेबी पोटॅटो १/२ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट १ टिस्पून गोडा मसाला ३-४ कढीपत्...

Baby Onion Bhaji

baby onion curry, kanda batata bhaji, baby potato recipe, baby onion recipe

साहित्य:
दिड कप बेबी ओनियन
पाऊण कप बेबी पोटॅटो
१/२ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
१ टिस्पून गोडा मसाला
३-४ कढीपत्ता पाने
फोडणीचे साहित्य: २ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद
दिड टिस्पून लाल तिखट
२ टिस्पून चिंचेचा कोळ
१ टेस्पून गूळ
मीठ

कृती:
१) बेबी ओनियन फ्रोझन नसतील तर प्रथम सोलून घ्यावे. फ्रोझन असतील तर कांदे सोलावे लागत नाहीत. बेबी पोटॅटोची साल अगदी पातळ असल्याने स्वच्छ धुवून सालासकट वापरले तर चांगले.
२) लहान कूकरमध्ये तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात कांदे, बटाटे घालावे. मध्यम आचेवर थोडावेळ परतावे. दाण्याचा कूट घालावा.
३) नंतर त्यात १ ते दिड पेला पाणी घालून एक उकळी आणावी. त्यात गूळ, चिंचेचा कोळ, गोडा मसाला आणि चवीपुरते मीठ घालावे. कूकरचे झाकण लावून ३-४ शिट्ट्या कराव्यात. वाफ मुरली कि गरम गरम पोळीबरोबर खावे.

Labels:
Baby Onion Curry, Sweet and sour Onion Curry, Baby Potato Curry, Baby Onion Bhaaji

Related

Rassa Bhaji 2866914362297001793

Post a Comment Default Comments

  1. आणि आता पर्यंत मला वाटत होते की हे फक्त सांबारात वापरतात.

    ReplyDelete
  2. छोट्या कांद्यांना गोडसर चव असल्याने भाजीला चव मस्त येते. सांबारात तर मस्तच लागतात.

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item