वेजिटेबल बिर्याणी - Vegetable Biryani

साहित्य: १ कप बासमती तांदूळ २ मध्यम कांदे पातळ उभे चिरून १/२ कप मटार ६-७ फ्लॉवरचे तूरे १/२ कप गाजराचे चौकोनी तुकडे १/४ कप फरसबीचे तुकड...

साहित्य:
१ कप बासमती तांदूळ
२ मध्यम कांदे पातळ उभे चिरून
१/२ कप मटार
६-७ फ्लॉवरचे तूरे
१/२ कप गाजराचे चौकोनी तुकडे
१/४ कप फरसबीचे तुकडे (आवडत असलेल्या भाज्यांचे तुकडे सुद्धा घालू शकतो)
१ कप टॉमेटोची प्युरी (३-४ मोठे टोमॅटो शिजवून त्याची मिकसरमध्ये २-३ टेस्पून पाणी घालून प्युरी करावी. प्युरी नंतर गाळून घ्यावी )
१०-१५ काजू बी
१ टेस्पून लसूण पेस्ट
१ टेस्पून आले पेस्ट
पाव कप घट्ट दही
३ ते ४ टेस्पून तूप किंवा बटर
१/२ टिस्पून लाल तिखट किंवा चवीनुसार
अख्खे गरम मसाले - १ इंच दालचिनीची काडी, ४-५ लवंगा, २-३ वेलची, ३-४ तमालपत्र, ४-५ काळी मिरी, १ मसाला वेलची
चवीपुरते मीठ
२ चिमटी केशर + २ टेस्पून गरम दुध

कृती:
::तळलेला कांदा::
१) एकूण कांद्यापैकी १/२ कांदा तेलामध्ये कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्यावा. जर ओव्हन असेल तर बेकिंग ट्रेमध्ये अल्यूमिनीयाम फॉईल ठेवावी. त्यात चिरलेल्या कांद्यापैकी निम्मा कांदा त्यावर पसरवा. १-२ टीस्पून तेल कांद्याला हलकेच चोळून घ्यावे. ४०० F ओव्हन गरम करावा. ट्रे मधल्या रॅकवर ठेवावा. मध्येमध्ये ट्रे बाहेर काढून कांदा थोडा परतावा म्हणजे सर्व ठिकाणी नीट शिजेल. कांद्याच्या कडा जर ब्राउन झाल्या कि ओव्हनचे टेम्परेचर २०० F वर ठेवावे आणि कांदा डार्क ब्राउन होईस्तोवर बेक करावा.
::बिर्याणीसाठी ग्रेव्ही:: (टीप ३ आणि ४)
२) कढईत १ टेस्पून तूप गरम करावे. त्यात काजू तळून घ्यावे. तळलेले काजू बाजूला काढून ठेवावेत. आता सर्व गरम मसाल्याचे साहित्य घालावे आणि काही सेकंद परतावे.
३) उरलेला कांदा घालावा. आले-लसूण पेस्ट घालावी. कांदा थोडा परतून फरसबी, फ्लॉवरचे तूरे, गाजराचे चौकोनी तुकडे, मटार या भाज्या घालाव्यात. तिखट आणि मीठ घालावे. मिठाचे थोडे जास्त घालावे. मध्यम आचेवर ३-४ मिनिटे वाफ काढावी.
४) वाफ काढली कि टॉमेटोची प्युरी घालावी. मध्यम आचेवर टॉमेटोचा कच्चा वास जाईस्तोवर शिजवावे. टॉमेटो शिजला आणि ग्रेव्ही घट्ट झाली नसेल तर ती होण्यासाठी मोठ्या आचेवर उकळी काढावी. मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झाले पाहिजे. कारण नंतर आपण यात दही घालणार आहोत. ग्रेव्ही पातळ राहिल्यास बिर्याणी बनवताना भात ओलसट होतो आणि मग बिर्याणी मोकळी होत नाही.
५) ग्रेव्ही गार झाली कि त्यात घोटलेले दही मिक्स करावे.
::भात::
५) बासमती तांदूळ पाण्यात धुवून निथळून घ्यावा. १५-२० मिनिटे निथळत ठेवावा.
६) नॉनस्टिक पॅनमध्ये १ टेस्पून तूप गरम करून त्यात १-२ लवंगा, १-२ वेलची आणि १ तमालपत्र घालून त्यांचा सुगंध येईस्तोवर परतावे. यात निथळलेळे तांदूळ घालावेत. मिडीयम हाय हिटवर तांदूळ कोरडे होईपर्यंत सतत परतावे. तांदूळ भाजतानाच दुसऱ्या गॅसवर दीड कप पाणी गरम करावे. तांदूळ चांगले परतले गेले कि त्यात गरम पाणी घालावे आणि गॅस मोठा ठेवावा. मीठ घालावे. पाण्याला उकळी फुटेल आणि भाताच्या पृष्ठभागावर पाणी दिसायचे बंद होईल. या पॉइंटला आच एकदम कमी करावी आणि वर झाकण ठेवावे. मंद आचेवर भात शिजू द्यावा.
७) भात शिजला कि हलकेच एका परातीत काढून ठेवावा आणि हवेवर गार होवू द्यावा. लगेच वापरायचा असल्यास ३-४ मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवावा.
बिर्याणी:::::
८) बिर्याणी बनवण्यासाठी शक्यतो खोलगट नॉनस्टिक पातेले घ्यावा. तळाला आधी तूप पसरवून घ्यावे. त्यावर एकूण भातापैकी १/४ भाग भात समान पसरवा. त्यावर तळलेल्या कांद्यापैकी थोडा कांदा, थोडे काजू आणि त्यावर थोडी ग्रेव्ही पसरावी. याच प्रकारे ३-४ थर बनवावे. प्रत्येक थरामध्ये चमचाभर तूप घातले तरी चालेल. सर्वात वरचा थर भाताचा असावा त्यावर दुधात कालवलेले केशर, काजू आणि तळलेला कांदा घालून भांड्यावर घट्ट झाकण ठेवावे. मंद आचेवर बिर्याणीला किमान २० मिनिटे तरी वाफ काढावी.
९) बिर्याणी तयार झाली कि गॅस बंद करून झाकण काढावे आणि हलकेच बिर्याणी मिक्स करावी. मिक्स करून थोडावेळ परत नुसतीच झाकून मुरू द्यावी.
गरम बिर्याणी काकडी-कांदा-टॉमेटोच्या रायत्याबरोबर सर्व्ह करावे.

टीपा:
१) कांदा तळण्यापेक्षा ओव्हनमध्ये कमी तेल वापरून छान कुरकुरीत होतो.
२) चव अधिक रिच होण्यासाठी टॉमेटोच्या ग्रेव्हीमध्ये १/४ कप हेवी क्रीम किंवा मिल्क पावडर घालू शकतो. क्रीम घातल्यास ग्रेव्हीला उकळी काढावी. आणि उकळताना क्रीम फुटू नये म्हणून सारखे ढवळावे.
३) हि ग्रेव्ही तयार करून ३-४ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो. म्हणजे हवी तेव्हा झटपट बिर्याणी तयार करता येते.
४) ग्रेव्हीमध्ये मिठाचे प्रमाण थोडे जास्त ठेवावे. भातामध्ये मिक्स झाल्यावर मीठ अड्जस्ट होते. बिर्याणी तयार झाल्यावर मीठ घालून मिक्स केल्यास शीतं मोडतात.
५) बिर्याणीच्या थरांमध्ये चिरलेली पुदिना पाने घातल्यास छान स्वाद येतो.

Related

Rice 2478441450673174363

Post a Comment Default Comments

  1. Hi प्रिया,

    मला नक्की आवडेल ....मी कालच या साइटवर अकाउन्ट उघडले आहे. पण आज ती साइट चालतच नाहिये. :( पण तरीहि मला तुमची मदत लागेलच..!!!

    ReplyDelete
  2. मनोगत आता सुरु झाले आहे. तेथे तुला दिवाळीमनोगत ही चर्चा सापडेल. त्यात तुला दिवाळीमनोगतला पाककृती कशी पाठवायची आणि इमेल ऍड्रेस इ. मिळेल. जर काही प्रॉब्लेम आला, काही कळलं नाही तर माझ्या ब्लॉगवर तुझा इमेल ऍड्रेस कळवशील का? माझ्या ब्लॉगवर कमेंट्स माझ्या अनुमतीशिवाय पब्लिश होत नाहीत त्यामुळे मी तुझा इमेल जाहिर करणार नाही पण इमेल लिहून तुला कळवेन. (मला वाटतं की तू मनोगतवर अकाउंट उघडलं आहेस तर पुढचं तुला तसं कळेलंच. :) )

    ReplyDelete
  3. Thanks for posting comment on my blog.
    Your comments encourages me to write more.
    I hope you will visit my blog often

    ReplyDelete
  4. wa! chhan pakakruti aahe. upamyachi kruti aani photo dekheel mastach.

    ReplyDelete
  5. धन्यवाद नंदन,
    तुझा मराठी blog मी नेहमी वाचते.

    ReplyDelete
  6. Sahich.. sagalyaach paakakrutI aani visheshatahaa photos taakalet te aavadale!
    keep it up...

    ReplyDelete
  7. Hi Vaidehi,
    Saglya pakkruti aani photos khup chhan aahet. Mi veg biryani try keli. khup chhan zali hoti. Thanks. Tu pulav kasa karaycha te sangshil ka, please? Thanks

    bbye

    ReplyDelete
  8. Hi Vaidehi..mi try keli hi recipe ..chhan zali hoti :)
    thank you very much !

    one more thing...using readymade tomato puree rather making at home..adds more taste to it :)..though it may not be that much healthy compared to homemade.

    ReplyDelete
  9. Thanks meenal,
    nakkich readymade pureemule color ani taste chhan yete. pan readymade puri gharat nehmich available astech ase nahi mhanun homemade puree vaparli ahe recipemadhye.

    ReplyDelete
  10. Hi Vaidehi,

    Mi kaal hi biryani banavali. Mast jhali.Thanks.Actually puree banavaycha kantala yet hota.Tomatoche barik barik pieces karavet asa moh hot hota pan parat vichar ala ki baba pahilyanda karat ahot tar exact recipe follow karavi ani mast jhali ga!! Lagech sampunhi geli.
    Tomatoche barik pieces telat kandyasobat nit paratale tar chav maar khail ka ga? tula kay vatata?

    Kaash aap non vegeterian hoti :).Ekhada non veg blog recommend karu shakashil ka? I know U dont eat but may be your friends told you about some blog...

    ReplyDelete
  11. HI VAIDEHI,
    ME VIDYA. ME TUJYA SARV RECEIPE VACHATE ANI JASTIT JAST BANVATE SUDDHA. KHUP CHHAN RESPONSE MILTO GHARATLYA LOKANKADUN. TUJHE DHANYAVAD KASE KARU HECH KAHI KALAT NAHI. ANKHIN CHHAN CHHAN RECEIPE TU AMHALA SHIKIV.

    ReplyDelete
  12. Hi Vidya,
    commentsathi manapasun dhanyavad,
    vachakanchya asha prostahanamulech ajun hurup yeto navin navin padarth banavnyacha..
    parat ekda thanks :)

    ReplyDelete
  13. Hi!
    Ek suggestion hota. Tandul shijavanya purvi ek tas panyat bhijavun thevale ki bhat ajun mokala hoto.

    ReplyDelete
  14. अफलातून साईट आहे तुमची. अजून पूर्ण पाहिली नाही. धन्यावाद.

    ReplyDelete
  15. धन्यवाद किरण

    ReplyDelete
  16. Hi Vaidehi,all ur recipies r just fantastic.everything comes so nicely.thanx.varsha

    ReplyDelete
  17. Hi varsha thanks for your comment..

    ReplyDelete
  18. Hi,
    Vaidehi

    I really like all the receipes. I am fond of rice can u please post the receipe of Dal Kichadi...

    ReplyDelete
  19. I will surely post dal khichadi recipe

    ReplyDelete
  20. Hi,
    Vidhahi
    H R You?

    mala Dal Makkhani chi recipie Havi Hoti. Ti Tu shikavishil ka?

    ReplyDelete
  21. must aahe lazzatdar aahe

    ReplyDelete
  22. ya sarv receipinch book nahi ahe ka. means amhala agdi soppe jail pahayala. superb receipes ha.

    ReplyDelete
  23. Commentsathi dhanyavad

    ya recipes che sadhyatari book nahiye..pan nighalyas nakki blog var tyavishayi suchit karen..

    ReplyDelete
  24. Tumchya saglya recipe khup chan ahet.mala tumche kalpna khup avdali.

    ReplyDelete
  25. khup chan recipes asatat tumachy mastach

    ReplyDelete
  26. मला वेगवेगवळे पदार्थ करायला खुप आवडतात.. आणि ते आपल्याकडून शिकायला मिळते..

    ReplyDelete
  27. मला वेगवेगवळे पदार्थ करायला खुप आवडतात.. आणि ते आपल्याकडून शिकायला मिळते..

    ReplyDelete
  28. मला वेगवेगवळे पदार्थ करायला खुप आवडतात.. आणि ते आपल्याकडून शिकायला मिळते..

    ReplyDelete
  29. कमेंटसाठी धन्यवाद महेश.

    ReplyDelete
  30. good afternoon miss your all recipes are easy but also tasty i try it but i requast you plese give recipes of CHIKAN BRIYANI i wait for this recipes thank you MADHURI

    ReplyDelete
  31. Hi Madhuri
    Thanks for your comment.
    I am a vegetarian and don't eat non-veg food. so, can't post chicken recipes.

    ReplyDelete
  32. Khup chan recipe ahe "Veg Biryani" chi. Thank you very much:)

    ReplyDelete
  33. Khup chan recipe ahe "Veg Biryani" chi. Thank you very much:)

    ReplyDelete
  34. Khup chan recipe ahe "Veg Biryani" chi. Thank you very much:)

    ReplyDelete
  35. Hello
    I have used this and a couple of other recipes...and each time had a great success. Thanks a bunch.

    ReplyDelete
  36. thanks for this blog i really loved it .as bcoz of this i made biryani frst time at home . everybody loves it. thanks

    ReplyDelete
  37. मला दम बिर्याणीची रेसेपी हवी आहे.

    ReplyDelete
  38. नमस्कार विनिता,
    दम बिर्याणीची रेसिपी सेम आहे फक्त वाटल्यास पातेल्यावर घट्ट झाकण बसवून अगदी मंद आचेवर वाफ काढ.झाकण एकदम घट्ट बसण्यासाठी रेस्टॉरंटमधील शेफ मळलेली कणिक पातेले आणि झाकणाच्या कडेने बसवतो, ज्यामुळे वाफ बाहेर जात नाही.

    ReplyDelete
  39. Hi Vaidehi tumchi Pohyachya chivadyachi receipe tray keli,chivada chaan jhala. Tahnks.

    Veg biryani madhe ek vicharaych hote bhajya shijvanyasathi tyamadhe paani ghalayche ka?, ki zaaknaavar paani thevun shijvaayachya? ki nustya vaafevar shijvaaychya.

    ReplyDelete
  40. hii vaidehi
    tumacha receipe chan asatat tumcha receipe vachunach mi jevan banvayala shikale thanx a lot vaidhehi for this tasty and simple receipe

    ReplyDelete
  41. वैदेही भावे मॅडम,
    मी तुमची ही साइट नेहमी बघतो. खुपच मस्त साइट तयार केली आहे तुम्ही. मी बरेच पदार्थ करून पाहिले आहेत आणि ते पण व्यवस्तीत जमले आहेत.
    मला सावजी मसाल्याची रेसिपी हवी आहे.कृपया सांगू शकाल का तुम्ही.

    ReplyDelete
  42. वैदेही भावे मॅडम,
    मी तुमची ही साइट नेहमी बघतो. खुपच मस्त साइट तयार केली आहे तुम्ही. मी बरेच पदार्थ करून पाहिले आहेत आणि ते पण व्यवस्तीत जमले आहेत.
    मला सावजी मसाल्याची रेसिपी हवी आहे.कृपया सांगू शकाल का तुम्ही.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद गौरव
      कमेंट लिहिल्याबद्दल धन्यवाद. मी नक्की पोस्ट करेन सावजी मसाला रेसिपी.

      Delete
  43. Your all recipe are very good and tasty thanks a lot

    ReplyDelete
  44. Hi Vaidehi Tai,

    Biryani try keli mi. Khupach chhan zali. Sagalyanach khup aavadali.
    Tuzya Sagalyach recipe chhan asatat. Mi baryach try kelya aahet. Chhotya tips mule chav perfect jamun yete.
    Thanks :)

    Prachee

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item